धाडसी तरुणाने केली ‘ती’ची चाकू हल्ल्यातून सुटका

December 3, 2016 2:20 PM0 commentsViews:

nagpur attack123

03 डिसेंबर : नागपुरात पत्नीच्या मृत्यूनंतर मेहुणीसोबत लग्न करण्यासाठी एका माथेफिरून तगादा लावला. पण सातत्याने लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात त्याने तिच्यावर चाकू-सुऱ्याने वार केला. या हल्ल्यात संबंधित महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे जर रस्त्यावरील लोकांनी हल्लेखोराला वेळीच अडवल्याने तिचे प्राण वाचले.

पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपी सिद्धार्थ आवळेने मेहुणीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. परंतु तिने नकार दिल्याच्या रागातून आरोपी सिद्धार्थने आवळेने, पाठलाग करुन सत्तूरने मेहुणी वंदना कावरेवर वार केले. मात्र रस्त्यावरील दोन तरुणांनी आरोपीला रोखल्याने वंदनाचे प्राण वाचले. त्यातील एकाचं नाव विजय गावंडे असं आहे. त्यांनी हिंमत केली नसती तर पीडित मुलीला आपला जीव गमवावा लागला असता.

दरम्यान पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ आवळेला पोलिसांनी अटक केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close