कोल्हापूरात ट्रक्स खाणीत कोसळली; 7 कामगारांचा मृत्यू

December 3, 2016 2:29 PM0 commentsViews:

caaduhpduahy

03 डिसेंबर : कोल्हापूरातील कागल तालुक्यातील बस्तवडे परिसरात काल रात्री कामगारांना घेऊन जाणारी खासगी ट्रक्स खाणीत कोसळली. ट्रक्सचालकाचा गाडीवरील ताबा अचानक सुटला आणि ट्रक्स खाणीत कोसळली. यात सात कामगारांचा मृत्यू झाला.

नेहमीप्रमाणे काम संपवून हे कामगार ट्रक्सने घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्या ट्रक्समध्ये 18 कामगार होते. कागल खाणीजवळ ही ट्रक्स आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक्स खाणीत कोसळली. यामध्ये संदीप सदाशिव लुल्ले, उदय रघुनाथ चौगुले, किशोर केरबा कुंभार, विनायक विलास चोपडे, बाबूराव कापडे आकाश ढोले आणि शहाजी तानाजी जाधव यांचा समावेश आहे. हे सर्वजण हमिदवाडा आणि हळदी येथील रहिवाशी होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close