नोटाबंदीचा असाही इफेक्ट, एलआयसीतून तब्बल 50 कोटींचा भरला प्रीमियम

December 3, 2016 3:00 PM0 commentsViews:

LIC3213jpg

03  डिसेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर जुन्या नोटा खपवण्यासाठी आणि काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी कोण कधी काय शक्कल लढवेल सांगता येत नाही. एका व्यक्तीने तर या नोटा खपवण्यासाठीएक नाही दोन नाही तर तब्बल 50 कोटी रूपयांचा प्रीमियम भरला आहे. एलआयसीच्या इतिहासातील एखाद्या व्यक्तीने काढलेली ही आजवरची सर्वात मोठी पॉलिसी आहे. याआधी  बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानेही असाच दोन कोटीचा प्रीमियम भरला होता  .

एलआयसीकडून 50 कोटीचा विमा उतरवून घेणारा हा व्यक्ती रियल इस्टेटशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतं. त्याने दादरच्या एलआयसी शाखेतून जीवन अक्षय पेन्शन योजनेअंतर्गत एवढ्या मोठ्या रकमेचा विमा उतरवला आहे. या योजनेच्या ऑफरच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी त्याने ही पॉलिसी घेतल्याचं सांगण्यात येते.  त्यात, नोटाबंदीमुळे बॅंकांनी व्याजदर घटवल्यानेही ग्राहकांनी ही पॉलिसी घेण्याकडे मोर्चा वळवल्याचं सांगण्यात येत आहे.

या योजनेच्या शेवटच्या दिवशी एलआयसीने एकूण 2 हजार ३०० कोटीचा विमा उतरवला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात एलआयसीत रेकॉर्डब्रेक प्रीमियम उतरवले गेल्याचंही समजतंय. एकट्या जीवन अक्षय योजनेत फक्त नोव्हेंबर महिन्यात 8 हजार कोटी रूपये एलआयसीला मिळाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिना एलआयसीसाठी दसरा दिवाळी ठरला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close