13,860 कोटींची माया जमवणाऱ्या महेश शाहला लाईव्ह कार्यक्रमातून अटक

December 3, 2016 8:41 PM0 commentsViews:

maesh_shah03 डिसेंबर : तब्बल 13 हजार 860 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या गुजरातमधील व्यापारी महेश शाह याला गुजरात पोलिसांनी आणि आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केलीये. नेटवर्क 18 च्या कार्यालयात लाईव्ह कार्यक्रमाच्या दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.

अहमदाबादमधील महेश शाह नावाच्या व्यापाऱ्याने इन्कम टॅक्स डिक्लेरेशन योजनेअंतर्गत आपल्याकडे 13,860 कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं. संपत्ती जाहीर केल्यानंतर पहिली फेड चुकवण्याआधीच महेश शाह फरार झाला होता. महेश शाहला पहिली फेड ही 1560 कोटी भरायची होती.

आज महेश शाह न्यूज 18 इंडियाच्या कार्यक्रमात समोर आला. त्यावेळी त्याने आपल्याकडे असलेली संपत्ती ही माझी नाही असा दावा केला. वेळ आल्यावर ही संपत्ती कुणाची आहे हे जाहीर अशी ग्वाहीही दिली. तसंच मी कुठेही फरार झालो नव्हतो. मी घाबरलो होतो त्यामुळे मी इन्कम टॅक्स विभागकडे गेलो नाही असंही शाह म्हणाला. या लाईव्ह कार्यक्रमात काही वेळातच आयकर विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्टुडिओ मध्येच महेश शाहला अटक केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close