सत्तेत असूनही वापर केला नाही, शिवसेना मंत्र्यांवर उद्धव ठाकरे नाराज

December 3, 2016 10:52 PM0 commentsViews:

uddhav_thackery_sa03 डिसेंबर : नगरपरिषदा निवडणुकीत शिवसेना बॅकफुटवर गेल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलीये. आज झालेल्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत “सत्तेत असूनही सत्तेचा वापर केला नाही” अशी खंत व्यक्त करत आपल्याच शिलेदारांवर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेना शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने सत्तेत असूनही सत्तेचा वापर केला नाही. मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यात फिरले, त्यांचे नेतेही राज्यभर फिरले. प्रचाराला फक्त पंतप्रधानच यायचे बाकी होते असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच मुंबई महापालिकेत युती होवो ना होवो शिवसेनेचा भगवाच महापालिकेवर फडकणारच असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. कालच पक्षातून कट्टर शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यावरुन उद्धव ठाकरेंनी पक्षांची घडातच किंमत जास्त असते, सुट्टी पक्षी स्वस्त मिळतात. त्यामुळे आपल्याला सोडून गेलेल्यांची आता काही किंमत नाही हे लक्षात ठेवा असंही कार्यकर्त्यांना बजावलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close