मोहाली टेस्टमध्ये भारताची स्थिती मजबूत.

October 19, 2008 6:49 AM0 commentsViews: 5

दिनांक 19 ऑक्टोबर, मोहाली- भारताकडे तीनशे रन्सच्यावर आघाडी आहे. आणि ऑस्ट्रेलियाचे पहिले पाच बॅट्समन दीडशेच्या आत आऊट झाल्यामुळे आता भारताचा प्रयत्न असेल तो ऑस्ट्रलियाला फॉलोऑन देण्याचा. सकाळी माईक हसी आणि शेन वॉटसनने इनिंग पुढे सुरू केली. हसीचा चांगला जम बसला होता. आणि त्याने सिंगल्स – डबल्स रन्स चपळाईने घेत आपली हाफ सेंच्युरी आज पूर्ण केली. पण ईशांतच्या एका शॉर्ट पीच बॉलने त्याला चकवलं. आणि विकेट कीपर धोणीकडे त्याने सोपा कॅच दिला. फॉलोऑन टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची भिस्त आता असेल ती शेन वॉटसनवरच. लंच टाइमपर्यत ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट गेल्या असून फालोऑन टाळण्यासाठी त्यांना 250 पेक्षा जास्त रन्सची गरज आहे.

close