नागपूर अधिवेशनात वाहनांना नो एंट्री

December 3, 2016 10:41 PM0 commentsViews:

nagpur vidhan bhavan03 डिसेंबर : नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या आत कुठल्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, सभापती, अध्यक्ष, अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचे वाहन सुद्धा बाहेर पार्क करण्यात येणार आहे.

सोमवार 5 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदा अनेक बदल करण्यात आले आहे. यावर्षीपासून विधानभवनच्या आत कोणाला ही आपले वाहन नेण्यास मनाई करण्यात आलीये. याआधी सर्वांच्या वाहनांना विधानभवनामध्ये आतपर्यंत नेण्यास मुभा होती. पण, काही ठिकाणी झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांना मुख्यद्वारापासून ते विधानसभेच्या पाय-यांपर्यंत पायी जावं लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close