अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक एकत्र

December 4, 2016 10:56 AM0 commentsViews:

NAGPUR ADHIVESHAN

04 डिसेंबर : विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नोटाबंदीच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. आज दुपारी नागपूरमध्ये विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंगल्यावर विरोधकांची बैठक होणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या नोटबंदीच्या मुद्यावरून राज्यात विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

आज संध्य़ाकाळी सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून ते 17 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे. यामध्ये सरकारला घेरण्यासाठीची रणनीती ठरवण्यासाठी विरोधक एकवटणार आहेत.

अधिवेशनात मराठा आरक्षण, नोटाबंदी अशा मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. मंत्र्यांचा विशेषतः आदिवासी विभागाचा भ्रष्टाचार आणि कुपोषण हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे, महिलांना अत्याचारात होणारी वाढ, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीत हे मुद्देही अधिवेशनात गाजणार आहेत.

गेल्या अनेक वर्षातलं सर्वात कमी कामकाज असलेलं अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे.आठवड्यात सुट्टीचे दिवस वगळता केवळ 8 दिवस कामकाज अपेक्षित आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close