14 डिसेंबरला विधान भवनावर धडकणार ‘मराठा मोर्चा’

December 4, 2016 12:11 PM0 commentsViews:

nagpur vidhan bhavan

04 डिसेंबर: नागपूर अधिवेशन काळामध्ये 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपूरच्या विधान भवनावर धडकणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी सरकारबरोबर चर्चेची तयारी दाखवलीये. आपण सरकारसोबत चर्चेला तयार आहोत मात्र सरकारने आपल्या मागण्याची सकारात्मकपणे दखल घ्यावी अशी मागणी मराठा महासंघाने केलीय.

नागपूर अधिवेशन काळामध्ये 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपूरच्या विधान भवनावर धडकणार असल्याचंही महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आलं.14 डिसेंबरला विधीमंडळावर हा मराठा मोर्चा काढण्यात येईल. मराठा मूक मोर्चाची रणनीती सांगण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close