मुंबईतही महेश शाह ?, एका कुटुंबाची तब्बल 2 लाख कोटींची संपत्ती !

December 4, 2016 7:20 PM0 commentsViews:

sayad_kutumba405 डिसेंबर : गुजरातमध्ये 13 हजार कोटींची बेनामी संपत्ती महेश शाहने जाहीर केल्याचं प्रकरण गाजत असतानाच आता मुंबईतच्या अब्दुल रज्जाक मोहम्मद सय्यद यांच्या कुटुंबियांनी तब्बल 2 लाख कोटी रूपयांची संपत्ती जाहीर केल्याची बाब उघड झालीये.

आयकर विभागात सादर झालेल्या कागदपत्रांमध्ये हे कुटूंब बांद्र्यात राहत असल्याचं स्पष्ट होतं. मात्र हे डिक्लरेशन संशयास्पद असून ते फेटाळण्यात आल्याची माहिती आयकर विभागानं दिलीये. सरकारनं काही महिन्यांपूर्वी जेव्हा अभय योजना जाहीर केली होती त्यानंतर या कुटुंबातल्या चार सदस्यांच्या नावे हे डिक्लेरेशन देण्यात आलं होतं. त्यातल्या पॅन कार्ड नंबरवरून आयकर विभागानं माहिती घेतली. त्यावेळे हे कुटुंब मुळचं अजमेरचं असून ते मुंबईत आलं असल्याचं स्पष्ट झालं. मुंबईतला जो पत्ता देण्यात आलाय. त्या ठिकाणी गेली काही वर्ष कुणीच राहत नाही. त्यामुळे असं डिक्लरेशन देण्याच काय कारण आहे याचा शोध आयकर विभाग घेत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close