सावधान !, तुमची नवी 500ची नोट नकली असू शकते

December 4, 2016 7:50 PM0 commentsViews:
500 ची खोटी नोट

500 ची खोटी नोट

05 डिसेंबर : नोटाबंदीच्या निर्णयाला फक्त 26 दिवस उलटले आहेत. मात्र गुन्हेगार सर्व नियम धाब्यावर बसवत आता खोट्या नोटा चलनात आणताना दिसत आहेत आणि याचा फटका बसला डोंबिवलीच्या एका रिक्षावाल्याला…नव्या 500 रुपयाची खोटी नोट देऊन फसवणूक करण्यात आलीये.

शनिवारी सकाळच्या सुमाराला डोंबिवलीमध्ये राहणारा सुनील नामक रिक्षावाला नेहमीप्रमाणे स्टेशन परिसरातील प्रवाशांची वाट पाहत थांबला होता. कल्याण-शिळ मार्गावरील लोढा हेवन येथे जायचे असल्याचे सांगून एकजण रिक्षात बसला. इच्छित स्थळी उतरल्यानंतर त्याने 500 रुपयांची नवी नोट काढून या रिक्षावाल्याला दिली. ठरलेल्या भाड्याप्रमाणे 100 रुपये वगळून उर्वरित 400 रुपये त्याने त्या प्रवाशाला दिले. पैसे हाती पडताच प्रवासी क्षणार्धात बेपत्ता झाला.

रिक्षावाल्याने 500 रुपयांची नोट चाचपडून पाहिली असता संशय आला. 8 AA 071718 असा क्रमांक छापलेल्या या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असल्याचे स्पष्ट दिसते. तथापी कागदाचा दर्जा आणि अल्ट्रा व्हायलेटद्वारे तपासली असता ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट दिसून आले. ही नोट आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केली असून तक्रार पण दाखल केली आहे असे नाईक यांनी सांगितलं. शिवाय नव्या नोटा घेताना नागरिकांनी काळजी आणि सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन नाईक यांनी केले. ही नोट पोलिसांच्या स्वाधीन केली असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

500 ची खरी नोट

500 ची खरी नोट

500 रुपयांची खोटी नोट कशी ओळखणार?

- खोट्या नोटेचा रंग थोडा वेगळा आहे

- खोट्या नोटेच्या मधल्या चांदीच्या लाईनमध्ये RBI लिहिलेलं नाही

- खोट्या नोटेच्या नंबरमध्ये पांढरा आकडा नाही

- खोट्या नोटेमधील महात्मा गांधींच्या फोटोमध्ये फरक
 
- खोटी नोट थोडी मोठी आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close