आठवीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे

May 10, 2010 5:44 PM0 commentsViews: 9

10 मे

राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे होणार आहे. राज्य सरकारने याविषयी जीआर काढला आहे.

6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळेत प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आता सरकारवर आहे.

केंद्र सरकारचा कायदा राज्यात लागू झाल्याने त्यातील सर्व तरतुदींचे राज्य सरकारला पालन करावे लागणार आहे.

शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही मुलाला नापास करता येणार नाही. किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही.

close