“हर जगह फूल खिला है, उनका मोगली हुआ है”, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

December 4, 2016 8:19 PM0 commentsViews:

cm_vs_ncp05 डिसेंबर : फडणवीस सरकारला डोरेमॉनची उपमा देणाऱ्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्टुनच्या भाषेत उत्तर देऊन पलटवार केलाय. “हर जगह फूल खिला है, उनका मोगली हुआ है” असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक एकत्र येऊन सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातलाय. या सरकारला विखे पाटलांनी डोरेमॉन कार्टूनची उपमा दिली. प्रत्येक संकटाच्या वेळी डोरेमॉन आपल्या पोतडीतून एखादे नवीन गॅजेट काढतो आणि त्या गॅजेटच्या आभासी वातावरणालाच वास्तविकता समजून नोबिता त्यात रममाण होतो, अशीच महाराष्ट्राची स्थिती असल्याची टीका विखे पाटलांना केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. नगरपरिषद निवडणुकीचा दाखला देत हर जगह फूल खिला है और उनका मोगली हुआ है असा टोला लगावलाय. विरोधक हे अजूनही प्रगल्भ झाले नाही ते अजूनही कार्टूनमध्येच अडकले आहे. फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधक विरोध करताय अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

‘सर्व व्यवहार सुरळीत’

नोटाबंदीनंतर राज्य सरकारच्या अनेक उपाययोजना केल्या होत्या.त्यामुळे राज्यात सर्वदूर सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. बाजार समित्यांमध्येही सगळे व्यवहार आता सुरळीत सुरू आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

‘सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने’

मराठा क्रांती मोर्चा हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतलाय. मराठा आरक्षण कुठल्या एका पक्षाचा विषय नसून हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. याबाबत कोर्टात राज्य सरकारच्या वतीने अभ्यासपूर्ण आणि भक्कम बाजू मांडणार आहोत. तसंचआम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने असून सभागृहात आम्ही याबाबत भूमिका मांडणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close