आयसीसनं तब्बल 24 तेल विहिरी पेटवल्या

December 4, 2016 8:46 PM0 commentsViews:

05 डिसेंबर : इराक मध्ये आयसीसनं त्यांच्या ताब्यात असलेल्या तब्बल 24 तेल विहिरींना आग लावलीये. इराकच्या अलक्वयारा या भागात या सर्व विहिरी आहेत.24 तेलविहिरींची ही आग प्रचंड भडकली असून काही किलोमीटरपासून आगीचे लोळ दिसत आहेत. तर काळ्या धुरानी आकाशही काळवटून गेलंय.

isis_fireआग विझवण्यासाठी अत्यंत अपुरी साधनं असल्यानं या आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य असून काही दिवस ही आग अशीच धुमसत राहणार असल्याचं तज्ञांनी सांगितलंय. या भागात राहणा•या लोकांनीही सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इराकचं सैन्य आणि आयएसआयएस दहशतवाद्यांमध्ये सध्या निकराचं युद्ध सुरू असून आपल्या हातून प्रदेश जातोय असं लक्षात आल्यावर हे दहशतवादी तेल विहिरींना आगी लाववून देत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close