जयललिता यांची प्रकृती चिंताजनक

December 5, 2016 9:49 AM0 commentsViews:

jyalalita_940x355

 

आतापर्यंतचे अपडेट्स

===============================================================================================

 

– जयललिता असिस्ट हार्ट डिव्हाईसवर, उपचारासाठी केंद्रानं पाठवलं 4 डॉक्टरांचं पथक

– लंडनचे डॉक्टर रिचर्ड बेले यांनाही चेन्नईत येण्याची विनंती

– जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे,अण्णा द्रमुकच्या सूत्रांची माहिती

– अम्मांच्या प्रकृतीसाठी तामिळनाडूत चाहत्यांच्या प्रार्थना

– अपोलो हॉस्पिटलबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

– तामिळनाडूमधील सुरक्षा वाढवली, सीआरपीएफच्या 9 तुकड्या तैनात

– तामिळनाडूमध्ये कर्नाटकची बस फोडली, बससेवा बंद

– राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांनी जयललितांच प्रकृतीची व्यक्त केली काळजी

– अम्मांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ट्विटरवरून प्रार्थना

===============================================================================================

05 डिसेंबर-  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांची प्रकृती चिंताजनकआहे. त्या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. आज सकाळी 9 वाजता अपोलो रुग्णालय मेडिकल बुलेटिन काढणार आहे, त्यातून आणखी माहिती मिळेल.

काल संध्याकाळी जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आला. 22 सप्टेंबरपासून त्या रुग्णालयात आहेत. अपोलो रुग्णालयतील आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. लंडनचे आयसीयू तज्ज्ञ डॉ. रिचर्ड बील यांच्याशी वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संपर्क साधला जातोय. लंडनहून डॉक्टरांची एक टीम मागवण्यात आलीय. ती संध्याकाळपर्यंत भारतात दाखल होईल. दिल्लीच्या एम्सचे तज्ज्ञ डॉक्टर कालच चेन्नईला रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, अम्मांचं ह्रदय, किडनी, यकृत आणि श्वसन प्रक्रिया निकामी झालीय. पण याबद्दल अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही.

– जयललिता यांच्या निवसस्थनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
– निवस्थानी येणा-या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे
– मोठ्या प्रमाणात पोलीस सर्वत्र तैनात
– सीआरपीएफ जवानांना अलर्ट राहणाचे आदेश


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close