अपोलो रुग्णालयाबाहेर अम्मा समर्थकांची गर्दी

December 5, 2016 10:30 AM0 commentsViews:

 

05 डिसेंबर :  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि तामिळ जनतेच्या अम्मा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकला.  चेन्नईच्या अपोलो रुग्णालयाबाहेर काल संध्याकाळपासून समर्थकांनी प्रचंड गर्दी केलीय. त्यामुळे पोलिसांनी तिथे अतिरिक्त बंदोबस्तही लावलाय. रात्री काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली.

अम्मांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरताय आणि त्यामुळे समर्थक भावनिक झालेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहे. द्रमुकच्या खासदार कनिमोळी रविवारी रात्री रुग्णालयात भेट देऊन गेल्या. तसंच इतर बडे नेतेही रुग्णालयात येऊन अम्मांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close