नोटबंदीच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी

December 5, 2016 4:30 PM0 commentsViews:

nagpur-vidhan-bhavan

05 डिसेंबर : नागपूरात आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. अपक्षेप्रमाणेच विरोधकांनी आज नोटबंदीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या सरकारकडे कोणतंही ठोस धोरण नाही आणि राज्यातल्या जनतेची दिशाभूल केली जातेय, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणसांचे आणि शेतकर्‍यांचे हाल होतायत, हाही मुद्दा विरोधकांनी लावून धरला.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीचा विषय चांगलाच गाजला. विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे नोटबंदीवर चर्चा करा, ही मागणी विरोधकांनी केली. पण विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. यावर विरोधकांनी गदारोळ केला. या गोंधळातच सरकारने 9 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. गदारोळामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब झालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close