कसाबला फाशी देण्याची संधी द्या

May 11, 2010 10:35 AM0 commentsViews: 1

11 मे

शेकडो मुंबईकरांचे प्राण घेणारा दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्याची संधी आपल्याला द्यावी, अशी मागणी हँगमॅन म्हणून ओळखले जाणारे जल्लाद अर्जुन भिका जाधव यांनी केली आहे.

जाधव यांनी 100 पेक्षा जास्त गुन्हेगारांना आतापर्यंत फाशी दिली आहे. जाधव आता निवृत्त झाले आहेत. पण सध्या महाराष्ट्रात फाशी देणारा कुणीही जल्लाद उपलब्ध नाही. त्यामुळे आपले कसब आणि अनुभव लक्षात घेऊन आपली विनंती मान्य करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त भुवनेश्वर आणि कोलकत्याला जाऊन जाधव यांनी गुन्हेगारांना फाशी दिली आहे.

महाराष्ट्रात पुणे आणि नागपूर या दोन ठिकाणच्या जेलमधे फाशीची व्यवस्था आहे. या दोन्हीही ठिकाणी फाशी देण्याचा अनुभव जाधव यांना आहे.

कुठलाही मोबदला न घेता कसाबला फाशी देण्याची मागणी निव्वळ देशप्रेमातून त्यांनी केली आहे.

close