तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष

December 5, 2016 5:02 PM0 commentsViews:

Trump and Tsai
05 डिसेंबर :  अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद साधल्यामुळे चीनचा संताप झालाय. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध तक्रार केलीय. तैवान हा चीनचाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. अमेरिकेनेही 1979 मध्ये तैवानशी औपचारिक संबंध तोडण्याबद्दलचं धोरण ठरवलं होतं.

आता डॉनल्ड ट्रम्प यांनी मात्र तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांच्याशी बातचीत केली. अमेरिका आणि तैवान यांनी आथिर्क, राजकीय आणि सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याचं ठरवलंय. अमेरिकेने तैवानचा मुद्दा सावधपणे हाताळावा नाहीतर अमेरिका आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण होतील, असा इशारा चीनने दिलाय.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी निवडून आल्यापासूनच चीनविरोधी भूमिका जाहीर केलीय. त्यामुळे चीन आणि तैवानमधले संबंध टोकाला गेलेत. तैवान हा अजून संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देशही नाही. या परिस्थितीत ट्रम्प यांनी तैवानला आंततरराष्ट्रीय स्तरावर मान्यता दिलीय. त्यामुळेच चीनने याचा निषेध केलाय. ट्रम्प यांच्या विरोधात आत्ताच संघर्षाची भूमिका घेणं चीनला परवडणारं नाही. त्यामुळे चीनने याबद्दल तैवानला टिकेचं लक्ष्य केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close