नाशिकमध्ये विद्याथिर्नीवर सामूहिक बलात्कार

December 5, 2016 7:40 PM0 commentsViews:

rape_634565

05 डिसेंबर : नाशिकच्या अंबडमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या आठवीच्या विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेतल्या सहा मुलांनी सामूहिक बलात्कार केला.या प्रकरणी नाशिक पोलिसांनी सगळ्या संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. ही मुलं नवीन नाशिक परिसरातल्या एका नामांकित शाळेचे विद्यार्थी आहेत.

या विद्याथिर्नीची तिच्याच शाळेत दहावीत शिकणार्‍या मुलाशी ओळख होती. या मुलाने तिला घरी बोलवलं, तिला गुंगीचं औषध पाजलं आणि तिच्यावर सहा जणांनी लैंगिक अत्याचार केले. या मुलीने भीतीमुळे हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. तिच्या आईच्या हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close