सेनेच्या खासदारांचं रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरकडे निवेदन

December 5, 2016 7:45 PM0 commentsViews:

_DSC9533 copy
 05 डिसेंबर :  नोटबंदीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदारांनी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरची भेट घेतली. नोटबंदीचा त्रास 50 दिवसांनंतरही कायम राहिला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असतील, अशी टीका शिवसेनेने केलीय. शिवसेनेचे खासदार रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्न आर. गांधी यांना भेटले. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे या तिघांनी आर. गांधी यांना निवेदन दिलं.

नोटबंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल या खासदारांनी डेप्युटी गव्हर्नरकडे निवेदन दिलंय. नोटबंदीचा निर्णय घेऊन महिना होत आला तरीही लोकांना दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत नाहीयेत हा मुद्दा त्यांनी या निवेदनात मांडला. ग्रामीण भागातली परिस्थिती शहरी भागापेक्षा बिकट आहे. त्यामुळे लवकरात लवकर जनतेला दिलासा द्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close