जेटएअरवेजचा कॉस्टकटींगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत

October 19, 2008 6:57 AM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर, मुंबई जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांना कामावर पुन्हा घेण्यात आलं आहे. पण त्यानंतर जेटसाठी कॉस्टकटींगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नोकरीवरून कमी केलेल्या कर्मचार्‍यांसाठी शुक्रवारी दिवाळीपूर्वीच दिवाळी सेलिब्रेट केली होती. त्यांना कामावर परत घेण्यात आलं होतं. आणि खुद्द नरेश गोयल यांनी त्यांची माफी मागितली आहे. कॉस्ट कटींगसाठी दुसर्‍या पर्यायाचा विचार करावा लागेल, असंही ते म्हणाले.त्यामुळे ऐन दिवाळीच्या सीझनमध्ये एअरलाईन्स कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकून जेटला आपल्या एकूण खर्चात तीन ते पाच टक्क्यांची बचत करायची होती. जेटकडे आता तेरा हजार कर्मचारी आहेत. त्यासाठी अंदाजे 1388 कोटी रूपये खर्च केले जातात. जेटने दहा टक्के कर्मचारी कमी केले तर त्यावर साठ कोटी रूपयांची बचत संपूर्ण प्रकरणानंतर, कर्मचार्‍यांच्या खर्चात वाढच होणार आहे. त्यामुळे एअरलाईन्स कंपन्यांना दुसरा कोणतातरी मार्ग शोधावा लागणार आहे. सध्या जेट एअरवेज कर्मचार्‍यांवर 1388 कोटी रूपये, फ्यूएलवर 4090 कोटी रूपये, लीजसाठी 821 कोटी रूपये आणि कमिशनवर 722 कोटी रूपये खर्च करतेय. त्यामुळे आता जेट खर्च कसा वाचवतेय हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरणार आहे.

close