शिवसेनेचे मनसेला उत्तर

May 11, 2010 11:08 AM0 commentsViews: 2

11 मे

शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञावर बोचरी टीका करणार्‍या मनसेचा आज शिवसेनेने 'सामना'तून चांगलाच समाचार घेतला आहे.

रक्तदानासारख्या पवित्र कार्याला 'रक्त काढण्याची' उपमा देऊन काहीजणांनी आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवल्याची टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी 'सामना'त लेख लिहून केली आहे.

रक्तदानासारख्या सामाजिक कार्यावर टीका करण्याची विकृती नवनिर्माणाच्या गप्पा मारणार्‍यांनी दाखवून दिली. खंडणीखोरीचे नवनिर्माण करणार्‍यांना रक्तदानाचे महात्म्य काय कळणार ? असा सवालही कदम यांनी केला आहे. तसेच रक्तदानावरची मनसेची टीका हा रक्तदात्यांचा अपमान आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

दिवसा 'खाद्यसंस्कृती' (खंडणीखोरी) आणि रात्री 'पेयसंस्कृती' जोपासणार्‍यांना रक्तदानाचे महात्म्य समजणेच शक्य नाही, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

शिवसेनेच्या जन्मापासून 80 टक्के समाजकारण करण्याची पक्षाची भूमिका राहिली आहे. पण शिवसेनेची कावीळ झालेल्यांना ही कामे न दिसणे स्वाभाविकच आहे, असेही कदम यांनी म्हटले आहे.

जगाला हेवा वाटेल असे काम करण्याची भाषा करणार्‍यांचे पदाधिकारी रोजच्या रोज खंडणी, बलात्काराच्या प्रकरणांमध्ये सापडत आहेत, असे म्हणत रामदास कदम यांनी मनसेला सणसणीत चपराक लगावली आहे.

close