नागपूरमध्ये 50 इथेनॉल बसेस

December 5, 2016 9:37 PM0 commentsViews:

scania-bus_650_082714050619

05 डिसेंबर : नागपूरमध्ये इथेनॉलवर धावणार्‍या 50 बसेस दाखल झाल्यायत. असा प्रयोग करणारं नागपूर हे देशातलं पहिलं शहर ठरलंय. इथेनॉलसोबतच बायोसीएनजीवर धावणार्‍या 150 बसेस नागपूरमध्ये आणण्यात आल्यायत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या हस्ते या बसेसचा शुभारंभ झाला.

या बसेस पूर्णपणे एअर कंडिशन्ड आहेत. नागपूरकरांचा प्रवास यामुळे आरामदायक आणि आल्हाददायक होईल, असं नितीन गडकरींनी सांगितलं. नागपूर महापालिकेने या बसेस परिवहन सेवेअंतर्गत खरेदी केल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close