मुंबईत आयएनएस बेटवा युद्धनौकेला अपघात, 2 नौसैनिकांचा मृत्यू

December 5, 2016 9:58 PM0 commentsViews:

ashdhauh

05 डिसेंबर :   भारतीय नौदलातील आयएनएस बेतवा ही युद्धनौका मुंबईजवळच्या समुद्रात अपघातग्रस्त झाली आहे. नेव्हल डॉकयार्डमधून समुद्रात ही युद्धनौका उतरवली जात असताना तिला अपघात झाला.  या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला असून 14 नौसैनिकांना वाजवण्यात यश आलं आहे.

आयएनएस बेटवा ही युद्धनौका भारतीय बनावटीची युद्धनौका आहे. मुंबईतील  नेव्हल डॉकमध्ये या युद्धनौकेची डागडुजी सुरु होती. सोमवारी दुपारी या युद्धनौकेला पुन्हा समुद्रात सोडताना युद्धनौका टेकूवरुन घसरली. या अपघातात 16 नौसैनिक अडकले होते. यातील 14 जणांची सुटका करण्यात यश आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे नौदलाने सांगितलं.

तांत्रिक त्रुटींमुळे हा अपघात झाला असून या घटनेची सविस्तर माहिती घेत असल्याचे नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अपघातात युद्धनौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र नौदलाने याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close