ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब

May 11, 2010 11:17 AM0 commentsViews:

11 मे

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यात आले होते. ते अपील आज फेटाळण्यात आले.

शैक्षणिक संस्था आणि राजकीय आरक्षणाच्या धर्तीवर हे आरक्षण देता येणार नाही, असा आक्षेप या निर्णयाच्या विरोधकांकडून घेण्यात आला होता.

मात्र आरक्षणाच्या या निर्णयामुळे घटनेचे उल्लंघन होत नाही, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा निर्णय कायम ठेवला आहे.

close