अम्मांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

December 6, 2016 11:08 AM0 commentsViews:

jayalalita_car06 डिसेंबर - जयललिता यांचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं.सोज्वळ पण त्याचवेळी धोरणी. शांत पण नजर भेदणारी. काय होती ही जादू. हे वादळ नेमकं काय होतं?

अम्मांचं सगळंच वेगळं.आता हेच बघा ना. चित्रपटात काम केल्यामुळे त्यांना लाईटस्‌चं महत्त्वं माहीत होतं. त्यामुळे त्यांच्या लँड क्रुझर प्रॅडोमधले लाईट त्या ऑन ठेवायच्या. म्हणजे दुरूनही दिसायचं की आत अम्मा आहेत. त्यांचा ताफाही पंतप्रधानांच्या ताफ्यासारखा.

बरं, दिल्लीत बैठक असली की, खुर्ची वेगळी असायची. तिथल्या तामिळनाडू भवनमध्ये अशा 3 खुर्च्या कायम तयार असत. गाडीही तामिळनाडूतून जायची. तीच ती, लँड क्रुझर.Jayalalithaa_B14564

त्यांचं बॅनरही वेगळंच बरंका. म्हणजे आपल्याकडे कसं देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे यांचं प्रत्येक फोटोमधला स्माईल तसं सारखंच. तिथे तसं नाही. कधी स्मितहास्य, कधी हास्य,कधी गंभीर चेहरा,कधी वाचतानाचा फोटो, कहर म्हणजे अम्मांच्या हातातनं फुलं वाहतायेत, असं ग्राफीक. काय विचारायची सोय नाही.

आता असं दृष्यं तुम्ही कधी पाहिलंंय, की नेता वर आणि बाकीचे 3 फूट खाली बसलेले.लोकशाहीतली ही सरंजामशाही म्हणा की हिटलरशाही.अण्णा द्रमुकचं हे वैशिष्ट्य

भारतात सर्वात जास्त अपरुप आहे ते त्यांच्या समर्थकांचं,त्यांचं नाचणं, अम्मांचा फोटो टी-शर्टवर, घडाळ्यात, गाडीवर, कुठेही. पण या सगळ्या मागे आहे ती निर्विवाद निष्ठा.

शेवटी काय, मुख्यमंत्रीपद हा फक्त एक पैलू होता.अम्मा एक प्रस्थ होतं. एक इतिहास. खरं सागायचं झालं, तर त्यांच्यासारखं व्यक्तिमतत्त्व पुन्हा होणे नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close