केळींचे बाग करपले

May 11, 2010 11:31 AM0 commentsViews: 1

11 मे

'दात आहेत तर चणे नाहीत', या म्हणीचा अनुभव सध्या जळगावातील केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत.

कारण कधी नव्हे तो गेल्या सात दिवसांपासून केळीचा भाव सातशे रुपये क्विंटलने वाढला आहे. पण कडक उन्हाळा आणि लोडशेडिंगच्या फटक्याने केळीच्या बागा करपून चालल्या आहेत.

केळी पिकाला भरपूर पाणी लागते. पण प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यातील सर्व 16 धरणांतील पाणीसाठा प्रशासनाने पिण्यासाठी राखीव ठेवला आहे.

पण किमान गिरणेच्या पाण्याचे आवर्तन शेतीसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

close