जिल्हा परिषदेविरुद्ध वृद्ध महिलेचे उपोषण

May 11, 2010 12:57 PM0 commentsViews: 7

11 मे

रत्नागिरीत जिल्हा प्रशासनाविरुद्ध उपोषणाला बसलेल्या वृद्ध महिला कलावती मोरे यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कलावती यांची रत्नागिरीतील मंडणगडमधील दुधेरे गावात जमीन आहे. त्या जागेवर कोणतीही संमती न घेता तसेच कुठलाही मोबदलाही न देता रत्नागिरी जिल्हा परिषदेने शाळा बांधली.

याविरोधात आत्तापर्यंत कलावती मोरे यांनी नऊ वेळा उपोषण केले. पण अजूनही या महिलेला न्याय मिळू शकलेला नाही.

विशेष म्हणजे दापोली मंडणगडचे शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी यांच्याच संमतीने प्रशासनाकडून आपल्यावर हा अन्याय होत असल्याचा आरोप कलावती यांनी केला आहे.

न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

close