इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरू – मुख्यमंत्री

December 6, 2016 6:42 PM0 commentsViews:

 

fadnvis on bbab

06 डिसेंबर : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील आंरराष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू करण्यात आलं आहे. हे स्मारक लवकरच पुर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर होणं ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. या स्मारकामुळे भावी पिढ्यांनी प्रेरणा मिळेल असं ते म्हणाले. देशातील सर्वसमस्यांचे उत्तर भारतीय संविधानात असल्याचं सांगतानाच बाबासाहेब तर त्यांनी नोटाबंदीला पाठींबा दिला असता असा दावाही फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close