हिवाळी अधिवेशनात भाजपची दुहेरी खेळी

December 6, 2016 7:45 PM0 commentsViews:

Vidarbha-Assembly-session-begins-in-Nagpur (1)

06 डिसेंबर - विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी काहीच कामकाज झालं नाही. राज्यात विस्तारासाठी भाजपची चाणाक्ष रणनीतीची झलक मात्र पाहायला मिळाली. भाजपने मराठा आरक्षणावर चर्चा घेत राष्ट्रवादीला धक्का दिला आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता ठराव मांडून काँग्रेसलाही धोबीपछाड दिला.

भाजपचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्याचा अजेंडाही आज समोर आला. हिवाळी अधिवेशन नोटबंदी आणि मराठा आरक्षण या दोन मुद्यावर केंद्रीत असेल हे नक्की झालं होतं. विरोधकांनी त्याची झलक चहापान आणि पहिल्या दिवशी दाखवली.

या सगळ्या स्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव भाजपने आणला आणि मराठा आरक्षणावर आम्ही गंभीर आहोत, असं दाखवून दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close