पैठणी साडीला स्वामित्व अधिकार

May 11, 2010 1:59 PM0 commentsViews: 97

11 मे

पुणेरी पगडी पाठोपाठ आता पैठणच्या पैठणी साडीला प्रदेश स्वामित्व अधिकार मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन संस्था म्हणजेच भौगोलिक उपदर्शन विभागाने हा दर्जा दिला आहे.

असा दर्जा मिळालेल्या वस्तूंचे इतर ठिकाणी उत्पादन करण्यास मनाई केली जाते. असा दर्जा मिळालेल्या वस्तूंच्या उत्पादनास, ज्या परिसरात ती वस्तू निर्माण होते तिथे प्रोत्साहन दिले जाते.

पैठणी कारागिरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. स्ट्रॉबेरीलाही असा प्रदेश स्वामित्वाचा अधिकार मिळाला आहे.

close