‘PayTM’ला टक्कर देणार राज्य सरकारच्या ‘महा वॉलेट’?

December 6, 2016 9:33 PM0 commentsViews:

Pay  TM lkaro

06 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस सोसायटीची संकल्पना मांडल्यानंतर आता राज्य सरकारनेही कॅशलेस होण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. Paytm (पेटीएम) सारख्या खाजगी ई-वॉलेटला पर्याय म्हणून, सरकारी ‘महा वॉलेट’ नावाचं ई-वॉलेट आणलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यावर भर दिला होता. कॅशलेस व्यवहारांमुळे भ्रष्टाचार आणि काळा पैशावर निर्बंध बसेल असे मोदींनी म्हटले होते. यानंतर आता राज्यातील भाजप सरकारही कामाला लागले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ‘महा वॉलेट’ या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली आहे. ‘महा वॉलेट’ ही सर्वात सुरक्षित ई सेवा असेल,  या वॉलेटमध्ये जनतेचे पैसे सुरक्षित राहतील, राज्यातील कोट्यावधी जनतेला या वॉलेटचा लाभ घेता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजूनतरी देशात कोणत्याही राज्य सरकारने अशाप्रकारचं ई वॉलेट आणलेलं नाही. त्यामुळे ‘महा वॉलेट’ हे देशातील पहिलंच सरकारी ई वॉलेट ठरणार आहे. नोटाबंदीमुळे एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बहुतेकजण आता कॅशलेस व्यवहार करत आहेत. सरकारकडूनही कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळे ‘महा वॉलेट’ सारखे ई-वॉलेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close