रेलरोको मागे; मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

December 7, 2016 9:52 AM0 commentsViews:

Kasara Railway Banner

07 डिसेंबर -  ऐन सकाळी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक खोळंबली आहे. कसारा-कल्याण दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू केले आहे.

खडवली स्टेशनजवळ मंगळवारी रात्री पॉवरब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे सकाळी अनेक लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच 5.55 मिनिटांची टिटवाळा लोकल थांबवून दोन एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग देण्यात आलं. त्यामुळे संतप्त प्रवांशानी टिटवाळ्याजवळ रेलरोको केला आहे.

परिणामी कल्याणहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या आणि कसाऱ्याहून कल्याणकडे येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. तसंच अनेक एक्स्प्रेस ट्रेन्सही रखडल्या आहेत.दुसरीकडे, कल्याणपासून सीएसटीपर्यंतची लोकल वाहतूक सुरळीत आहे.

दरम्यान, रेलरोको थांबवा, ट्रेनमध्ये चढा, जेणेकरुन कसारा-कल्याणदरम्यानची लोकल वाहतूक सुरु होईल, असं आवाहन मध्य रेल्वेने टिटवाळा स्टेशनवरील आंदोलक प्रवाशांना केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close