‘राजनीती’विरुद्ध दावा

May 11, 2010 2:38 PM0 commentsViews: 1

11 मे

प्रकाश झा यांच्या 4 जूनला रिलीज होणार्‍या 'राजनीती' या सिनेमात सोनिया गांधींची बदनामी झाल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला आहे.

या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात झाली आहे. या संदर्भात हायकोर्टाने कोणतेही आदेश न देता 10 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

या सिनेमातील अभिनेत्री कतरिना कैफची भूमिका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आधारीत असल्याचा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते नसीम खान यांनी केला आहे.

close