ऐश्वर्या रायच्या आत्महत्येची अफवा वायरल

December 7, 2016 2:15 PM0 commentsViews:

aish-featured-1

07 डिसेंबर: व्हॉट्सॲपवर कधीही काहीही येतं आणि आपण न पाहता ते फॉरवर्ड करत असतो.यात कसं आणि काय पसरवलं जाईल याचा काही नेम नसतो.ऐश्वर्या रायच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची अफवाही व्हॉट्सॲपवर वायरल झाली.त्यात कहर म्हणजे काही वेब पोर्टल्सनी त्याची शहानिशा न करता ती बातमी म्हणून प्रसिद्धही केली.

‘आउटलूक पाकिस्तान’मधल्या ‘त्या’ बातम्यांनुसार ,’कौटुंबिक कारणांमुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.’ए दिल है मुश्किल’मधल्या रणवीर कपुरसोबतच्या इंटिमेट सिन्समुळे तिला घरात छळ करण्यात येत होता.याच कारणाने तिनं इतकं मोठं पाऊल उचललं.’

कहर म्हणजे त्यांनी तिच्या स्टेटमेंटचाही उल्लेख केलाय .त्यात ती म्हणते,’असं दु:खी आयुष्य जगण्यापेक्षा मी मरणं बरं.मला मरू द्या.’

अशा घटनांना सामोरं जावं लागणारी ती पहिली अभिनेत्री नाही. याआधीही अमिताभ बच्चन,देव आनंद,शशी कपुर आणि कादर खान यांच्या मरणाच्या खोट्या-नाट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवल्या गेल्या आहेत.आपण मात्र इंटरनेटवर असलेली प्रत्येक गोष्ट खरी आणि बरोबर मानतो.मात्र लोकांपर्यंत बातम्या पोचवणारी माध्यमंच जर अशी अविश्वासार्ह वागली तर नेमक्या कुणावर विश्वास ठेवणार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close