भारतीय टीमसाठी आज ‘करो या मरो’…

May 11, 2010 3:05 PM0 commentsViews: 6

अमित बोस, सेंट ल्युशिया

11 मे

टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारतासाठी 'करो या मरो'ची मॅच असणार आहे.

सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवावे लागणार आहे. आणि यासाठी भारतीय बॅट्समनना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. रात्री साडेदहा वाजता ही मॅच रंगणार आहे.

क्रिकेटमध्ये कोणीही भाकित करू शकत नाही. लागोपाठ दोन पराभव होऊनसुद्धा पाकिस्तान टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. तर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेने आपले 'चोकर्स' हे नाव कायम ठेवले आहे. आणि आता भारतीय टीमही सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी आकडेवारीवर अवलंबून आहे. त्यांना आजच्या मॅचमध्ये श्रीलंकेला हरवायच आहे. आणि तेही मोठ्या फरकाने….

रन रेटप्रमाणे सध्या भारत सगळ्यात तळाला आहे… पण हे चित्र बदलू शकते…

जर आज भारताने श्रीलंकेला 20 रन्स किंवा त्यापेक्षा जास्त रन्सने हरवले किंवा लंकेने दिलेले टार्गेट भारताने 17.4 ओव्हरमध्ये पार केले तर त्यांचा रन रेट श्रीलंकेपेक्षा जास्त होईल.

पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला हरवणे गरजेचे आहे. असे झाल्यास भारताचे सेमी फायनलमधील स्थान निश्चित होईल.श्रीलंकेची परिस्थिती काही वेगळी नाही. पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध मॅच खेळताना फ्लॉप बॅटींगमुळे टीमच्या आत्मविश्वासावर नक्कीच परिणाम झाला असेल.

सेंट ल्युशियामध्ये लीगमधल्या आपल्या दोन्ही मॅच जिंकल्याचा फायदा भारतीय टीमला होईल. यात दक्षिण आफ्रिकेवरचा विजय महत्त्वाचा आहे. आणि आता शॉट पीच बॉलवर खेळण्याचा सरावही बॅट्समन करत असतील. टीममध्ये काही बदल होण्याचे संकेतही मिळालेत. ऑऊट ऑफ फॉर्म असणार्‍या रविंद्र जडेजाच्या ऐवजी लेग स्पिनर पियुष चावला किंवा विनय कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे लागोपाठ 3 मॅचमध्ये फ्लॉप कामगिरी केल्यामुळे मुरली विजयला विश्रांती देण्याचा विचारही संघव्यवस्थापन करत आहे… त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅचमध्ये विजयासाठी भारताच्या अनुभवी प्लेअर्सना मोठी खेळी करावी लागणार आहे.

युवराज आणि धोणी यांच्याकडून स्पर्धेत अजून मोठी खेळी बघायला मिळालेली नाही. त्यामुळे सगळ्या क्रिकेट फॅन्सचे लक्ष त्यांच्याकडे असणार आहे.

close