व्याजदर जैसे थेच !, 11.5 लाख कोटी जुन्या नोटा जमा

December 7, 2016 4:34 PM0 commentsViews:

rbi_new207 डिसेंबर : रिझर्व्ह बँकेने आपलं पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केलंय. आरबीआयने कोणतेही व्याजदरात बदल केले नसून जैसे थेच दर ठेवले आहे. 6.5 टक्केच व्याजदर राहणार आहे. नोटाबंदीनंतर पतधोरणावर परिणाम होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही.

नोटाबंदीनंतर व्याजदर कमी होणार अशी आशा लागून होती. मात्र, रिझर्व्ह बँकेनं अशी शक्यता फेटाळून लावलीये. व्याजदर हे 6.5 टक्केच राहणार असं गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी स्पष्ट केलं. तसंच नोटाबंदीदरम्यान 11.5 लाख कोटी नोटा जमा झाल्यात अशी माहितीही पटेल यांनी दिली. देशाचा विकासदर अर्ध्या टक्क्यानं कमी होण्याची शक्यता पटेल यांनी व्यक्त केलीये. यावर्षी जीडीपी 7. 6 टक्के राहण्याचा अंदाज होता. पण नोटाबंदीनंतर विकासदर अर्ध्या टक्क्यानं घसरुन 7. 1 टक्के होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close