डिंकाचे लाडू खाणार त्याला…

December 7, 2016 5:45 PM0 commentsViews:

07 डिसेंबर- महाराष्ट्रात सगळीकडे चांगलीच थंडी पडायला लागलीय.थंडी आणि डिंकाचे लाडू हे समीकरण ठरलेलं असतं. भारतात हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवले जातात.डिंक,गव्हाचं पीठ,तुप,खोबरं,गुळ आणि भरपुर सुका मेवा वापरून हे लाडू बनवले जातात.पाहूयात या डिंकाच्या लाडवांचे फायदे-

1.डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते.

2.आजींच्या सल्ल्यानुसार बाळ-बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू अतिशय उपयोगी असतात. यामुळे शरीराला मजबुती येते. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात.

3.डिंकात भरपुर पौष्टिक मूल्य असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

4.पाठीच्या हाडाला डिंक मजबुत बनवतं.त्यामुळे लहान मुलांना डब्याला किंवा सकाळी दुधासोबत नाश्त्याला हे लाडू देता येतील.

5.डिंकाची चिक्कीसुध्दा खायला चांगली असते.

6. डिंकात जास्त फॅट्स आणि कॅलरिज् असतात. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.

7. डिंकाचे लाडू उष्ण असतात, म्हणून जपून खावेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close