प्रेमप्रकरणातून गावात राडा, 30 घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ

December 7, 2016 6:02 PM0 commentsViews:

chinchner_Vandan07 डिसेंबर : साताऱ्यातील चिंचनेर वंदन इथं गावात दोन गटात वाद होऊन 30 घऱांची तोडफोड आणि अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून विवाहीत मुलीचा खून केल्याच्या कारणातून ही घटना घडली आहे.

चिंचणेर वंदन येथील तरुणीचा सिद्धार्थ दणाने या मुलासोबत प्रेमसंबंध होते. पण मुलीचं तीन महिन्यापुर्वी लग्न जमलं. त्याचा राग मनात धरून मुलानं मुलीचा खून केला. मिसींग तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ दणानेला ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणानंतर जमावाने या भागातील वस्तीवर हल्ला चढवत जवळपास 30 ते 35 घरांची तोडफोड करत जाळपोळ केली. यावेळी जमावाने जवळपास 15 गाड्याही जाळल्या यात पोलिसांच्या दोन मोटरासायकलीही जाळल्या. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांनी जमावातील 30 जणांना अटक केली. गावातील पुरुष मंडळी हे मुंबईला गेले होते. त्यामुळे गावात फक्त महिलाच होत्या. त्यामुळे वस्तीवरील महिलांना या जमावाने मारहाण केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close