पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला मिळाली वाहतूकव्यवस्थापनाची शिक्षा

October 19, 2008 7:07 AM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर, पुणे पुण्यातली ट्राफिकची समस्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि ट्रॅफिकच्या नियमांचा भंग हा काहींना मोठा पराक्रमही वाटतो. मात्र पुण्यात असा पराक्रम करणा-या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला वाहतूक विभागाने शिक्षा दिली आहे ती ट्राफीक कंट्रोल करण्याची. मानस सेन नावाच्या या तरुणाने सेनापती बापट रोडवर वेताळबाबा चौकात झेब्रा क्रासिंगवर गाडी उभी करून ट्राफिक हवालदाराला धक्काबुक्की केली. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला जामीनावर सोडण्यात आलं ते एका अटीवर. ज्या चौकात त्याने हा गुन्हा केला त्याच चौकात त्याला पाच दिवस रोज दोन तास ट्राफीक कंट्रोल करण्याची अनोखी शिक्षा भोगावी आता लागत आहे.

close