चोरानं साखळी खेचल्यानं महिलेचा लोकलखाली मृत्यू

December 7, 2016 6:12 PM0 commentsViews:

07 डिसेंबर : एका साखळी चोरामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. या साखळी चोराने महिलेच्या गळ्यातून साखळी चोरताना तिला हिसका दिला. यात ही महिला लोकल ट्रेन खाली येऊन मृत्यू पावली.

मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान कुर्ला स्टेशनवर एक महिला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर कल्याणच्या दिशेने जाणा-या लोकल ट्रेनची वाट पाहत होती. त्यावेळी एक सोन साखळी चोर ज्याचं नाव रफी बैरागी चरण हा अचानक या माहिलेजवळ आला आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं.kurla_local_accident

त्यात या महिलेचा तोल गेला आणि प्लॅटफाॅर्मवर पडली त्याच वेळी अचानक सीएसटीकडून कल्याणला जाणारी लोकल आली आणि त्या लोकलच्या धक्क्याने ही महिला लोकलखाली खेचली गेली. आर पी एफ पोलीस आणि प्रवाशांनी महिलेला ताबडतोब सायन रुग्णालयात उपचारासाठी नेलं पण तिचा मृत्यू झाला होता. तर साखळी चोर हा पळून जात असताना प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार येथे असलेल्या सीसीटीव्ही त कैद झाला.आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close