नोटाबंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे राजनाथ सिंगांच्या भेटीला

December 7, 2016 7:07 PM0 commentsViews:

uddhav_meet_Rajnath07 डिसेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. या बैठकीत नोटबंदीसह महत्वांच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठक संपल्यावर मात्र उद्धव पत्रकारांशी काहीही बोलले नाहीत.

नोटबंदीवरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध पहिल्यासारखे राहिले नसल्यानं उद्धव यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. उद्धव दिल्लीत दोन,तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. या काळात ते पंतप्रधानांना भेट का याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. दरम्यान, नवी दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली. बैठकीच्या तपशीलाबाबत मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी तपशील सांगण्यात नकार दिला. याआधीही उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close