रांगेत उभं राहणाऱ्यांना देशभक्त जाहीर करा, सेनेकडून भाजपची कोंडी

December 7, 2016 7:12 PM0 commentsViews:

sena_bjp307 डिसेंबर : विधानसभेत आज नोटा बंदीच्या मुद्यावरनं विरोधकांपेक्षा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडलं.

नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेल्यांपैकी काही लोकांचा मृत्यू झाला आहे त्या लोकांना 10 लाख रुपये मदत करावी त्याच बरोबर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभं राहणं ही देशभक्ती आहे असं जाहीर करा अशी मागणी शिवसेनेनं करत भाजपला कोंडीत पकडलं.

तर नारायण राणे यांनी विधानपरिषदेत सरकारला पाचशेच्या नव्या नोटा दाखवून त्याची छपाई चुकीची असल्याचा आरोप केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. सहकारी बँकांचा गळा का आवळतायेत, असा सवालही चव्हाण यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close