डॉनल्ड ट्रम्प ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’

December 7, 2016 9:04 PM0 commentsViews:

donald_trump 07 डिसेंबर : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवड झालीय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध अनपेक्षित विजय मिळवला. त्यानंतर ट्रम्प यांना हा सन्मान मिळालाय.

हा किताब माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असं डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही नावं ‘पर्सन ऑफ द इयर’च्या शर्यतीत होती. डॉनल्ड ट्रम्प यांची त्यांच्या रोखठोक मतांमुळे निवड करण्यात आली, असं टाईमच्या व्यवस्थापकीय संपादक नॅन्सी गिब्ब्ज यांनी म्हटलंय.

हिलरी क्लिंटन या यादीत दुस-या स्थानावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही वाचकांच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर होते. वाचकांचा कौल मोदींना अनुकूल होता. पण वाचकांचा कौल काहीही असला तरी ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’ची निवड टाईम नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असते. टाईमच्या संपादक मंडळाने डॉनल्ड ट्रम्प यांची निवड केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close