लिबियात विमान अपघात, 105 ठार

May 12, 2010 9:21 AM0 commentsViews: 6

12 मे

लिबियात आफ्रिकिया एअरवेजच्या विमानाला झालेल्या अपघातात 105 प्रवासी ठार झाले आहेत.

मृतांमध्ये 94 प्रवासी आणि 11 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

त्रिपोली आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात झाला.

आफ्रिकिया एअरवेजचे 8 यू 771 या विमानाला हा अपघात झाला.

हे विमान दक्षिण आफ्रिकेहून येत होते. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.

close