म्हाडाची घरे नियमानुसारच

May 12, 2010 11:11 AM0 commentsViews: 8

12 मे

राजयोग गृह सोसायटी प्रकरणी जे सदस्य म्हाडाच्या अटी पूर्ण करतील त्यांनाच घरे दिली जातील.

तसेच म्हाडाच्या नियमांची पूर्तता केली जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

म्हाडाच्या नियमांनुसार मुंबईत स्वत:चे घर असलेल्या व्यक्तीला म्हाडाचे घर घेता येत नाही. असे असूनही अनेक आमदार आणि मंत्र्यांना वर्सोवा इथे म्हाडाची घरे मिळणार आहेत.

हे प्रकरण काल दिवसभर सर्वच प्रसारमाध्यमांनी लावून धरले होते.

close