तुम जियो हजारो साल…

December 8, 2016 2:23 PM0 commentsViews:

Dharmendra-00409122015-GossipTicket

08 डिसेंबर: अभिनेते धर्मेंद्र आज 81वर्षांचे झाले. पण ते स्वत:हून कधी आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. आपल्याला जन्म दिलेली आईच या जगात नाही, तर वाढदिवस कशाला साजरा करायचा,असं त्यांचं म्हणणं आहे.

धर्मेंद्र म्हणतात,’माझे फॅन्स माझा वाढदिवस जोरदार साजरा करतात. त्यातच मला आनंद आहे. लहानपणी माझी आईही माझा वाढदिवस साजरा करायची. सोहळा असायचा. आता आहे तो फक्त वाढदिवस.’

हिंदी चित्रपट सृष्टीत धर्मेंद्रनं एक काळ गाजवला होता. बॉलिवूडचे ते ‘ही मॅन’ होते. खुद्द दिलीप कुमार यांनीही धरमपाजींची तारीफ केली होती. ‘देवानं मला त्यांच्यासारखं का नाही बनवलं, असं मी देवाला विचारीन,’ हे दिलीप कुमार यांचे उद्गार आणि मोठी काँप्लिमेंट.

आपला नातू आता मोठ्या पडद्यावर झळकणार म्हणून धर्मेंद्र खूश आहेत. ते म्हणतात,’माझी मुलं माझ्यापेक्षा पुढे गेली,आता त्यांची मुलं आणखी पुढे जातील.’

ते लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ते म्हणतात,’मी सिनेमाशिवाय राहू शकत नाही.’
81वर्षीही त्यांचा उत्साह,उर्जा कायम आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close