युवराज-हेजलचं शानदार रिसेप्शन

December 8, 2016 2:54 PM0 commentsViews:

08 डिसेंबर : चंडीगड आणि गोवा इथे लग्नाचा सोहळा झाल्यावर युवराज सिंग आणि हेजलच्या लग्नाचं रिसेप्शन दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडलं.

या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते. राहुल गांधींची उपस्थिती लक्ष वेधून गेली. अर्थमंत्री अरुण जेटलीही आवर्जून आले होते.तर महेंद्र सिंग धोनी आपल्या कुटुंबासोबत आला होता. तर माजी कप्तान सौरभ गांगुलीही हजर होता.

बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूरही या समारंभाला आले होते.हरभजनसिंग त्याची बायको गीता बसरासोबत आला होता. सहारा प्रमुख सुब्रत रॉयही रिसेप्शनला उपस्थित होते.

सेलिब्रिटींच्या उपस्थितीनं युवराज-हेजलचं रिसेप्शन ग्लॅमरस झालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close