उन्हाळ्यात लोडशेडिंगचा चटका

May 12, 2010 11:36 AM0 commentsViews:

12 मे

उन्हाच्या झळा वाढत आहेत. उन्हाच्या चटक्यांनी जनता हैराण झाली आहे. आणि त्यात भर टाकली आहे, लोडशेडिंगने.

ग्रामीण भागातील लोडशेडिंग 15 तासांवर जाऊन पोहोचले आहे. शहरी भागांमधील भारनियमनातही वाढ झाली आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये जिथे शून्य लोडशेडिंग आहे, तिथेही आता लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे.

एकीकडे वीज निर्मितीत घट होत आहे. तर दुसरीकडे एमएसडीसीएलने वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. याला अनेक नागरी संघटनांनी विरोध केला आहे. याबाबात राज्यभर सह्यांची मोहीम राबवली जात आहे.

यामुळे याविषयी वीज नियामक आयोगातर्फे राज्यातील विविध भागांमध्ये जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

एक नजर टाकूया आत्तापर्यंत झालेल्या वीज दरवाढीवर….

17 ऑगस्ट 2009 – 25 पैसे

ऑक्टोबर 2009 – 50 पैसे

30 नोव्हेंबर 2009 – 21 पैसे

3 डिसेंबर 2009 – 35 पैसे

13 जानेवारी 2010 – 15 पैसे

17 जानेवारी 2010 – 35 पैसे

मार्च 2010 – 15 पैसे

याविषयी एमईआरसी तर्फे वेगवेगळ्या शहरांमध्ये जनसुनावणी होणार आहे.

या जनसुनावणीच्या तारखा पुढीलप्रमाणे…

14 मे – अमरावती

15 मे – नागपूर

17 मे – नाशिक

19 मे – पुणे

21 मे – औरंगाबाद

22 मे – नवी मुंबइ

close